महिलेस दमदाटी करून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य





महिलेस दमदाटी करून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणाऱ्या दोघाजणांविरुद्ध गुन्हा दाखल 



पनवेल दि. १० ( वार्ताहर ) : एका महिलेस शिवीगाळी व दमदाटी करून मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणाऱ्या दोघाजणांविरुद्ध तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .


 
                       तालुक्यातील पाले खुर्द येथे राहणाऱ्या ३९ वर्षीय पान टपरीचा व्यवसाय करणाऱ्या एका महिलेस आरोपी रमजान खान वय ( ३० ) व एक अनोळखी इसम यांनी राग मनात धरून सदर महिलेस शिवीगाळी व दमदाटी करून मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याने या दोघांविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .


थोडे नवीन जरा जुने