खांदा कॉलनीत 31मे रोजी मोफत आधार ,पॅनकार्ड शिबीर!
1 जून रोजी नेत्र चिकित्सा शिबिर आणि मोफत चष्मे वाटप
पनवेल /प्रतिनिधी:- परिवर्तन सामाजिक संस्थेचे संस्थापक कामगार नेते महादेव वाघमारे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने31 मे रोजी खांदा कॉलनी येथे सकाळी 9 ते 2 यादरम्यान आधारकार्ड व पॅन कार्ड शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्याचबरोबर 1 जून रोजी मोफत नेत्रचिकित्सा व चष्मे वाटप शिबिर याच कालावधीत संपन्न होणार आहे. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन महादेव वाघमारे यांनी केले आहे.
सामाजिक कार्यकर्ते महादेव वाघमारे हे परिवर्तन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेल्या दशकभरांपेक्षा जास्त काळ सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. संस्थेच्या माध्यमातून विविध ज्वलंत विषयांवर वाघमारे यांनी आवाज उठवला. वेगवेगळ्या प्रश्नांना वाचा फोडून प्रशासनाचे लक्ष वेधले. मोठ्या प्रमाणात नागरी समस्यांची सोडवणूक करण्यात त्यांना यश मिळाले. परिवर्तन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वर्षभर विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
संस्थेचे संस्थापक महादेव वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त 31 मे ला खांदा वसाहतीत वरदविनायक गार्डन सोसायटीमध्ये मोफत आधार कार्ड आणि पॅन कार्ड शिबिर संपन्न होणार आहे. या ठिकाणी मोफत दोन्ही कार्ड नागरिकांना काढून मिळतील. 1 जून रोजी याच ठिकाणी आर .जे .शंकर आय हॉस्पिटलच्या माध्यमातून मोफत नेत्र चिकित्सा शिबिर आणि चष्मे वाटप केले जाणार आहे. तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून डोळ्यांची तपासणी केली जाणार असल्याचे परिवर्तन सामाजिक संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
Tags
पनवेल