सेवा निवृत्त पोलिस निरीक्षक प्रभाकर साळवी यांना पत्नीशोक







सेवा निवृत्त पोलिस निरीक्षक प्रभाकर साळवी यांना पत्नीशोक
पनवेल दि.२७ (वार्ताहर) : सेवा निवृत्त पोलिस निरीक्षक प्रभाकर भालचंद्र साळवी यांच्या पत्नी कै. निता प्रभाकर साळवी यांचे वयाच्या 80 व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
            त्यांच्या पश्चात मोठा मुलगा पुणे पोलिस उप निरीक्षक मोहन प्रभाकर साळवी, दुसरा मुलगा मुंबई येथे पोलिस उप निरीक्षक




राजेश साळवी (2007 साली मयत) आणि सर्वात लहान मुलगा विकास साळवी नवी मुंबई पोलीस दलातील पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. यांच्यासह सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. खारघर येथील स्मशानभूमीत त्यांच्या अंत्ययात्रा विधीला पोलीस अधिकाऱ्यांसह, नातेवाईक, कुटुंबीय, समाजबांधव व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने