विदेशी सिगारेटची विक्री करणाऱ्या पानटपरी चालकांवर कारवाई

विदेशी सिगारेटची विक्री करणाऱ्या पानटपरी चालकांवर कारवाई
पनवेल दि.२६ (संजय कदम) : पनवेल शहरातील अवैध व्यवसायांविरोधात पनवेल शहर पोलिसांनी मोहीम सुरू केली असून शहरामध्ये विनापरवाना विदेशी सिगारेटची विक्री करणाऱ्या पानटपरी चालकांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून सुमारे ३२ हजार रुपयांच्या साठा जप्त केला आहे.
                   पनवेल शहरातील विविध भागात शासनाने बंदी घातलेल्या इ-सिगरेट तसेच अन्य तंबाखूजन्य पदार्थांची छुप्या पद्धतीने विक्री होत असल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, पोलीस हवालदार वाघमारे, खरात, म्हात्रे, वायकर, सतमकर, पोलीस नाईक पाटील, पारधी, देशमुख, पोलीस शिपाई पाटील, दाहीजे आदींच्या पथकाने पनवेल शहरातील फॉरेस्ट कॉलनी परिसर, साईनगर येथील करण पान शॉप तसेच वेलकम हॉटेल परिसरातील पानटपरीवर झडती घेऊन विनापरवाना विदेशी सिगारेट व सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थची विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करत ३२ हजार रुपये किमतीचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात सिगारेट व इतर तंबाखु उत्पादने (जाहीरात प्रतिबंध आणि व्यापार व वाणिज्य व्यवहार आणि उत्पादन, पुरवठा व वितरण यांचे विनियम) महाराष्ट्र सुधारणा : अधिनियम २०१८ चे कलम ७ (३), २० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थोडे नवीन जरा जुने