वाहतूक पोलिसांकडून प्रथम वाहचालकांचे प्रबोधन त्यानंतर कारवाई


वाहतूक पोलिसांकडून प्रथम वाहचालकांचे प्रबोधन त्यानंतर कारवाई

वाहतूकीचे नियम मोडणाऱ्या 1513 वाहन चालकांवर कारवाई

गेल्या पाच महिन्यात कारवायाचा धडाका : वाहतुकीचे नियम पाळण्याचे आव्हान 

पनवेल शहर वाहतूक शाखेची धडक मोहीमपनवेल -- नो एंट्रीत प्रवेश करणे, सीटबेल्ट, काळ्या काचा, नो एंट्रीत प्रवेश करणे, हेल्मेट न वापरणार्‍यांविरुद्ध पनवेल शहर वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे हे स्वता रस्त्यावर उतरत कारवाईची धडक मोहिमेला सुरुवात केली आहे. त्यानुसार गेल्या पाच महिन्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 1513 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर अगामी काळात मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती पनवेल शहर वाहतुक शाखेकडून देण्यात आली.
राज्यात हेल्मेट सक्ती मोठ्या प्रमाणात गाजत आहे. मोठमोठ्या शहरात याबाबत अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. त्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात प्रबोधन आणि जनजागृती करण्यात येत आहे. परिसरात आता दुचाकीस्वार हेल्मेट घालूनच प्रवास करीत आहेत. काही अपवाद वगळता हेल्मेट न चुकता घातले जात आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे वाहतुक शाखेने बिगर हेल्मेटविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. वास्तविक पाहता हेल्मेट घालणे हे दुचाकी स्वाराच्या फायद्याचे आहे. यामुळे कित्येकदा अपघातात प्राण वाचतात याचे कारण म्हणजे डोक सुरक्षित राहते त्याला मार लागत नाही. असे असतानाही काही दुचाकीस्वार हेल्मेट घालत नसत त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई पनवेल शहर वाहतूक शाखेने केली आहे.या वेळी नो एंट्रीत प्रवेश करणे, चारचाकी वाहनांना काळ्या काचा, सीटबेल्ट, ट्रिपल शिट, सिंग्नल जांपिंग, नो पार्किंग, अवजड वाहने, दारू पिऊन वाहन चालवीने, अवैध प्रवासी वाहतूक, कर्कस आवाज करणारे वाहने अशी धडक मोहीम राबविण्यात आली आहे. पोलीस आयुक्त, तसेच पोलीस उपायुक्त वाहतूक यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी जानेवारी ते मे या पाच महिन्यात पनवेल परिसरात रस्त्यावर उतरून कारवाई करीत असल्याने कोणाचीही गय केली गेली नाही. त्यानुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 1513 वाहन चालकांवर कारवाई केली आहे.आम्ही सीटबेल्ट न वापरणे, काळ्या काचा, नो एंट्रीत प्रवेश करणे, विना हेल्मेट चालणार्‍या वाहनचालकांवर कारवाईची विशेष मोहीम हाती घेतली आहे. पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पाच महिन्यात 1513 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच याबाबत जनजागृतीही करण्यात आली. त्याचा परिपाक म्हणजे हेल्मेट वापरणार्‍यांची संख्या कमालीची वाढली आहे. त्यामध्ये आनखी भर पडेल असा विश्वास आम्हाला वाटतो.

थोडे नवीन जरा जुने