बेदरकारपणे चालवणाऱ्या ट्रकचालकाचा मधून खाली पडून मृत्यू

बेदरकारपणे चालवणाऱ्या ट्रकचालकाचा मधून खाली पडून मृत्यू
पनवेल दि.०४ (संजय कदम) : हयगयीने, बेदकार व निष्काळजी पणे चालवून ट्रक मधून स्वतःच्या चूकीने खाली पडून ट्रकचालक गंभीर जखमी होवून त्याचा मृत्यू झाल्याची घटना पनवेल जवळील नितळस गाव परिसरातील वावंजे ते मलंगगड रोडवर घडली आहे. या घटनेची नोंद तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 


           ट्रकचालक सोनू भारत लाल (वय २६, रा.उत्तरप्रदेश) हयाने त्याच्या ताब्यातील ट्रक (एमएच ४३ बीपी १९६४) नितलस गावाजवळ वावंजे ते मलंगगड रोडवर हयगयीने, बेदकार व निष्काळजी पणे चालवून जात असताना ट्रक मधून स्वतःच्या चूकीने खाली पडून त्यात तो गंभीर जखमी होऊन यात मृत्यू झाला. 


याबाबत तळोजा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०४(अ), २७९ सह मोटार वाहन अधिनियम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गोरे करीत आहेत.


थोडे नवीन जरा जुने