पनवेल फॉरेस्ट कॉलनी एटीएम च्या समोर आढळला इसमाचा मृतदेह






पनवेल परिसरातील फॉरेस्ट कॉलनी एटीएम च्या समोर आढळला इसमाचा मृतदेहपनवेल दि ०५ ( संजय कदम) : पनवेल परिसरातील अनकी हेरिटेज सोसायटी जवळ फॉरेस्ट कॉलनी एटीएम च्या समोर इसमाचा मृतदेह आढळला 


असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत. सदर इसम रंगाने सावळा, उंची पाच फूट चार इंच, डोक्याला टक्कल, चेहरा उभट, अंगाने माध्यम असून अंगात हाप बाह्याचा फिक्कट लाल रंगाचा टी- शर्ट त्यावर ग्रे रंगाची लाईन व खिशाला रॉयन इंटरनॅशनल स्कुल असे इंग्रजी भाषेत लिहिलेला शर्ट, ग्रे रंगाची फुल पॅन्ट असा पेहेराव आहे 



या इसम बाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी ०२२- २७४५२३३३ किंवा पोहवा एच. जी. आहिरे यांच्याशी संपर्क साधावा 


थोडे नवीन जरा जुने