६ लाख ४४ हजार रुपये किमतीचा ई-सिगारेटचा साठा पोलिसांनी केला जप्त६ लाख ४४ हजार रुपये किमतीचा ई-सिगारेटचा साठा पोलिसांनी केला जप्त
पनवेल दि. ०५ ( वार्ताहर ) : गुन्हे शाखेने खारघर सेक्टर ४ मध्ये छापा टाकून ६ लाख ४४ हजार रुपये किमतीचा ई-सिगारेटचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी अर्जुन राठोड (वय २७) नावाच्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.               येथील श्री महावीर एक्स्प्रेस सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड, श्री लक्ष्मण व्हिला इमारतीच्या गाळ्यामध्ये ई-सिगारेटचा साठा ठेवला असल्याची माहिती गुन्हे शाखेचे हवालदार संतोष गायकवाड यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सदर गाळ्यामध्ये छापा टाकला.


 गाळ्याची पाहणी केली असता तेथे ६ लाख ४४ हजार १०० रुपये किमतीच्या विविध फ्लेव्हरच्या ईसिगारेट आढळल्या. हा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी अर्जुन राठोडविरोधात द प्रोहिबिशन ऑफ इलेक्ट्रॉनिक सिगारेट अॅक्ट २०१९ चे कलम ४ (१) ७ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान शहरात या प्रकारे गुन्हे उघडकीस येत असल्याने याबाबत पोलिसांनी ठिकठिकाणी गस्त वाढवली असून अधिक तपास सुरू केला आहे.


थोडे नवीन जरा जुने