सारडे ग्रामपंचायतीच्या वतीने
आदिवासी बांधवांना गृहोपयोगी साहित्य व आदिवासी तरुण बांधवांना बँजो साहित्याचे वाटप
उरण दि २९(विठ्ठल ममताबादे ) सारडे ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयात बेलवाडी सारडे येथिल आदिवासी बांधवांना ग्रामनिधी सन २०२२-२३ अंतर्गत १५% मागासवर्गीय खर्च त्यामध्ये बेलवाडी येथील २० कुटुंबांना गृहोपयोगी वस्तू म्हणून २ चादर,१डबल ब्लँकेट,१सिंगल ब्लँकेट व उदरनिर्वाहासाठी बँजो साहित्य त्यामध्ये १ कॅसीओ, २ ड्रम, १ ताशा, १ मशीन, १ भोंगा १ युनिट व दोन रोटो ड्रम इ. साहित्य वाटप करण्यात आले.
या साहित्यांचे वाटप सारडे ग्रामपंचायतीचे सरपंच रोशन पाटील,उपसरपंच जिवन पाटील ,ग्रामपंचायत सदस्य अमित म्हात्रे, महेश पाटील, तसेच ग्रामपंचायत सदस्या प्रतिक्षा पाटील,कामिनी पाटील, अमिता पाटील, व अस्मिता म्हात्रे तसेच ग्रामसेविका संचिता केणी यांच्या हस्ते करण्यात आले
.यावेळी प्राथमिक शाळा सारडेच्या मुख्याध्यापिका उर्मिला म्हात्रे,निवृत्त अडव्होकेट हिरामण गजानन पाटील,अंगणवाडीसेविका, ग्रामपंचायत कर्मचारी व सारडेचे ग्रामस्थ उपस्थित होते.
Tags
उरण