शेतकरी कामगार पक्ष उरण व मयुर सुतार मित्र मंडळ आयोजित लाल बावटा चषक 2023 उत्साहात संपन्न.
महादेव घरत, राजेंद्र पाटील यांच्या हस्ते उदघाटन.
उरण दि 29(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील नवीन शेवा गाव येथे शेकापचे उरण विधानसभा अध्यक्ष मयुर सुतार यांनी मयुर मित्र मंडळ उरण संघटना व शेकाप यांच्या संयुक्त विद्यमाने कबड्डी स्पर्धा,अंडर आर्म क्रिकेट, आणि हॉलिबॉल या नाईट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन द्रोणागिरी स्पोर्टचे अध्यक्ष महादेव घरत,अंडर आर्मचे उदघाटन राजेंद्र पाटील यांच्या शुभहस्ते झाले.यावेळी रायगडभूषण प्रा.एल.बी.पाटील,काका पाटील, युवानेते रमाकांत म्हात्रे, यशवंत ठाकूर,तालुका चिटणीस विकास नाईक,महादेव बंडा,किसन सुतार,बाळकृष्ण पाटील, वासुदेव म्हात्रे,स.ही.पाटील, भारत पाटील, सचिन पाटील, स्वप्नील पाटील, निरंतन पाटील,मयूर म्हात्रे, राकेश भोईर,ग्रामपंचायत सदस्या भावना भोईर,रेखा म्हात्रे,महेश म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. खेळाडूंनी आपल्या खेळाने प्रेक्षकांना प्रभावित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाम ठाकूर व लक्ष्मण म्हात्रे यांनी सुरेख केले.कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक गणेश क्लब बोकडविरा, द्वितीय क्रमांक बोरी, तृतीय पनवेल चौथा क्रमांक भेंडखळ यांनी पटकाविले तर क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांक कोटनाका, द्वितीय के के करंजा, तृतीय क्रमांक आर डी कोळीवाडा, चौथा क्रमांक बोकडविरा संघाने पटकविला. या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाल्याने पुढील वर्षी या स्पर्धा जिल्हा स्तरीय स्वरूपात घेणार असल्याचे मयूर सुतार यांनी सांगितले.
मयूर सुतार मित्र मंडळ ही संघटना जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी तरुणांना नोकरी मिळवून देण्यासाठी, खेळांमध्ये तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी स्थापन केल्याचे सांगत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्वांचे मयूर सुतार यांनी आभार मानले.
Tags
उरण