पनवेल दि.२६ (वार्ताहर) : पनवेल बस स्थानकाहून आपल्या सोलापूर येथील मूळगावी जाण्यासाठी निघालेली २३ वर्षीय तरुणी आपल्या मुळ गावी न पोहोचल्याने ती बेपत्ता झाल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या तरुणीचा कसून शोध पोलीस करीत आहेत.
रोहीणी दत्तात्रय कोळी असे या तरुणीचे नाव असून तिचे वय २३ वर्षे, उंची ५ फुट, वर्ण सावळा, बांधा सडपातळ, चेहरा गोल, नाक सरळ व लांब, केस काळे असे तिचे वर्णन आहे. तिने अंगात गुलाबी-निळया-पांढया रंगाचा कुर्ता व गुलाबी रंगाचा सलवार व निळया रंगाचे जॅकेट असा पंजाबी ड्रेस परिधान केला असून पायात काळया रंगाची सॅण्डल घातलेली आहे.
सदर तरुणीला मराठी, हिंदी, कन्नड भाषा बोलता येते. या तरुणीबाबत कोणास काही माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी क्र ०२२-२७४५२३३३ किंवा पोलीस हवालदार बोरसे यांच्याशी संपर्क साधावा.
Tags
पनवेल