महिला बेपत्ता

महिला बेपत्ता
पनवेल दि.२६ (संजय कदम) : स्वतःच्या लहान मुलाकडे जाते असे सांगून पनवेल शहरातील टपालनाका येथून आपल्या घराबाहेर पडलेली महिला बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.                प्रमिला रविंद्र गुप्ता असे या महिलेचे नाव असून तिचे वय ५३ वर्षे, उंची ५ फुट १ इंच, रंग सावळा, नाक सरळ, केस काळे, चेहरा उभट, बांधा सडपातळ, डोळे काळे तसेच अंगात चॉकलेटी रंगाची साडी घातलेली आहे.


 या महिलेने डोक्यावर कपडे असलेली गुलाबी रंगाची पिशवी सोबत घेतलेली आहे. या महिलेबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी क्र ०२२-२७४५२३३३ किंवा पोलीस हवालदार नितीन आखाडे यांच्याशी संपर्क साधावा. थोडे नवीन जरा जुने