पनवेल मधील कुंभारवाडा परिसरातील विजेच्या लपंडावाचा प्रश्न लागला मार्गी; शिवसेनेचा यशस्वी पाठपुरावापनवेल मधील कुंभारवाडा परिसरातील विजेच्या लपंडावाचा प्रश्न लागला मार्गी; शिवसेनेचा यशस्वी पाठपुरावा
पनवेल दि.२५ (संजय कदम) : शिवसेनेचा यशस्वी पाठपुरव्याने पनवेल मधील कुंभारवाडा परिसरातील विजेच्या लपंडावाचा प्रश्न लागला मार्गी लागला आहे. बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेल्या विजेच्या प्रश्नावर तातडीने पाठपुरावा करून तोडगा काढल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.
पनवेल शहरातील कुंभारवाडा मिरची गल्ली परिसरात मोठी लोकसंख्या राहत असून तिथे विजेची जुनी उपकरणे, जुने वायरिंग व वाढत असलेला विजेचा वापर या कारणांमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून सतत फलक्च्युएशन चा त्रास होत होता. या प्रश्न पनवेल शिवसेनेचे प्रभाग १४ चे विभागप्रमुख ॲड. आशिष पनवेलकर यांनी शहर प्रमुख प्रसाद सोनावणे यांच्या नेतृत्वात महावितरण कार्यालय येथे भेट घेऊन या प्रश्नाबाबत उपकार्यकारी अभियंता श्री. बोके यांस निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधले. यावेळेस शहरप्रमुख प्रसाद सोनावणे, आशिष पनवेलकर व शाखाप्रमुख प्रतीक वाजेकर उपस्थितीत इतर पदाधिकारी यांची अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा झाली.
निवेदन दिल्यानंतर विभाग प्रमुख पनवेलकर यांनी या प्रश्नाचा पाठपुरावा सुरूच ठेवला आणि दोन दिवसात महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून या भागात नवीन डी.पी. त्वरित बसवण्यात आला व त्यासाठी आवश्यक नवीन वायरिंग देखील बदलण्यात आले. तोंडावर आलेल्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर देखील या कामाचे विशेष महत्त्व आहे. बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेल्या विजेच्या प्रश्नावर तातडीने पाठपुरावा करून तोडगा काढल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.
Tags
पनवेल