श्री साई नारायण बाबा यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त ‘स्तनांच्या आजारांची तपासणी’; दोन सामुदायिक विवाह संपन्न

श्री साई नारायण बाबा यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त ‘स्तनांच्या आजारांची तपासणी’; दोन सामुदायिक विवाह संपन्न 
पनवेल दि.२० (संजय कदम) : सद्गुरू श्री साई नारायण बाबा यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त पनवेलच्या साईबाबा मंदिर येथे श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्ट आणि पनवेल एकेटी(AKT) फाउंडेशन च्या माध्यमातून पहिल्यांदाच स्तनांच्या आजारांची तपासणी शिबिराचे आयोजन आज करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ अनेक महिलांनी घेतला. तसेच यावेळी दोन सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला.पनवेल रेल्वे स्टेशन रोडवरील श्री नारायण बाबा आश्रम येथील श्री साई बाबा मंदिरात पूज्य सदगुरु श्री साई नारायण बाबा यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त आज श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्ट आणि पनवेल एकेटी(AKT) फाउंडेशन च्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात पहिल्यांदाच स्तनांच्या आजारांची तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते


. या शिबिरात जवळपास ४० ते ५० महिलांची या शिबिराचा लाभ घेतला. दरम्यान सकाळी दोन सामुदायिक विवाह सोहळे संपन्न झाले आत्ता पर्यंत ८५ विवाह सोहळे ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आले आहेत. दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम, १४० हुन अधिक विधवा महिलांना राशन आणि १०८ हुहन अधिक मुलांना गृहपयोगी वस्तू देण्यात येणार असल्याची माहिती डॉ शाकुंतला भटिजा यांनी यावेळी दिली. यावेळी डॉ. अरविंद टकले उपस्थित होते.थोडे नवीन जरा जुने