पनवेल परिसरात आढळला अनोळखी मृतदेह





पनवेल परिसरात आढळला अनोळखी मृतदेह 
पनवेल दि.१७ (संजय कदम) : पनवेल परिसरात एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. सदर इसमाच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत. 



           सदर इसमाचे अंदाजे वय ४५ ते ५० वर्षे असून त्याचा रंग सावळा, केस काळे व पांढरे वाढलेले, चेहरा उभट, उंची ५.४ इंच, अंगाने मध्यम असा वर्णन आहे. तसेच अंगात काळया रंगाचा हाफ बाहयाचा टि-शर्ट लाल रंगाची हाप पॅन्ट घातलेली आहे. 



सदर इस्माबाबत किंवा त्याच्या नातेवाइकांबद्दल कोणास काही माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी क्र ०२२-२७४५२३३३ किंवा पोलीस उपनिरीक्षक किरण वाघ (मो. ९९७०१८९२९८) यांच्याशी संपर्क साधावा. 
फोटो : पनवेल परिसरात आढळलेला मृतदेह


थोडे नवीन जरा जुने