ज्येष्ठ नागरिक महिलेला दोन भामट्यांनी दीड लाख रुपये किमतीच्या दागिन्याला फसविले
ज्येष्ठ नागरिक महिलेला दोन भामट्यांनी दीड लाख रुपये किमतीच्या दागिन्याला  फसविले
पनवेल दि. ०५ ( वार्ताहर ) :  पनवेल येथे राहणाऱ्या ६५ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिक महिलेला दोन भामट्यांनी फसविले आहे.


 तिच्या कडील दीड लाख रुपये किमतीचे दागिने पळवून नेले आहेत.                   येथे राहणारी वृद्ध महिला सकाळी मसाला व भाजीपाला आणण्यासाठी मार्केटमध्ये गेली होती. शनेश्वर इमारतीजवळ एक व्यक्ती त्यांना भेटली. आमच्या शेठला मुलगा झाला आहे. 


तो नागरिकांना भेटवस्तू वाटत आहे. तुम्हीही चला, असे सांगितले. या व्यक्तीवर विश्वास ठेवून त्यांच्यासोबत गेलेल्या महिलेला दुसऱ्या एका व्यक्तीने तुमच्याकडील दागिने काढून ठेवा, असे सांगितले. महिलेने ९० हजार रुपये किमतीच्या बांगड्या व ६० हजार रुपये किमतीचे इतर दागिने असे एकूण दीड लाख रुपये किमतीचे दागिने घेऊन पलायन केले. या प्रकरणी पनवेल शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.


थोडे नवीन जरा जुने