बसस्थानकाच्या दोनशे मीटरच्या परिघात खाजगी वाहनांना नो इंट्री करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने या आधीच दिले आहेत. याबाबत या आधी वाहतूक शाखेने धडक मोहीम हाती घेतल्याने काही खाजगी ट्रॅव्हल्स बसस्थानकासमोरून न जाता पुलावरून जात असून रात्रीच्या. वेळी खाजगी ट्रॅव्हल्स बसेस बसस्थानकाजवळील उड्डाणपुलाखाली उभ्या राहत असून लग्नसराईत एसटी महामंडळाचे प्रवासी खाजगी बसने प्रवास करत असल्याने एसटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान तर होतच आहे. परंतु बस महामार्गा शेजारी बेकायदेशीर उभ्या राहत असल्याने भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज्यात मे महिना सुरु झाल्यापासून लग्नसराई सुरु आहे. याकरिता चाकरमनी देखील गावाकडे एक दिवसाकरिता होईना पण येत आहेत. या प्रवाशांना ने आन करण्यासाठी महाराष्ट्र एस. टी. महामंडळ सज्ज आहे. मात्र प्रवासी खाजगी वाहनांकडे वेळेचे कारण पुढे करत वळत आहेत. याचा फायदा खाजगी वाहन चालकांना झाला असून राज्यात हि वाहने खुली आम वाहतूक करीत आहेत. या वाहनांना कोणतेही प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी नसली तरी चाटेल ते दर लावून सध्या प्रवासी वाहतूक केली जात आहे. वाहन चालक आता एस. टी. महामंडळाच्या परिसरात वाहने आणून उभी करू लागले आहेत. एस. टी. महामंडळाकडे पुरेसा सुरक्षा कर्मचारी वर्ग नसल्याने आणि याठिकाणी पोलीस देखील नसल्याने हि प्रवासी वाहतूक जोमाने सुरु आहे. उदाहरणार्थं महाड ते पनवेल वाहतूक करणाऱ्या छोट्या वाहनचालकांकडून सध्या प्रवाशांची लुट सूरु आहे.
महाड ते पनवेल असे भाडे जवळपास ४५० रुपये आकारले जात आहे. एस. टी. चे तिकीट दर या प्रवासाकरिता निम्मे आहे. तसेच या वाहनावर कामकरणार चालक हे कुशल नसतात, नशा करून गाडी चालविने, वाहनांचा इंशुरन्स नसने टायर आणि वाहनांची स्थिती व्यवस्थित नसणे, अशा धोकादायक परस्थितीत ही खाजगी वाहतूक प्रवासची वाहतूक करत असते. या वाहनांना होणार अपघातात प्रवाशांना मोठ्याप्रमाणात नाहक प्राण गमवावे लागत आहेत. पनवेलहून पुणे, सोलापूर, सातारा, कन्हाड, सांगली, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, कोकण, गोवा, सुरत, अहमदाबाद आदी ठिकाणी खासगी ट्रॅव्हल्स जातात. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विर्दभ, कोकण अशा राज्यातील विविध भागात मुंबईहून थेट या खाजगी बसेस सोडण्यात येतात.
Tags
पनवेल