उलवे शहराला फेरीवाल्यांचा विळखा






उलवे शहराला फेरीवाल्यांचा विळखा

नवी मुंबई शहरासह उलवे परिसरामध्ये देखील फेरीवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे उलवे सेक्टर 23 सेक्टर 2 व अनेक सेक्टर या ठिकाणी तसेच फूटपाथवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केलेले पाहायला मिळत आहे.



मुख्य म्हणजे सेक्टर २३, सेक्टर २ येथे सिडकोने स्वतःचे भुखंड असलेल्या ठिकाणी फलक लावलेले आहेत. मात्र तरीही भूमाफियांनी येथे कब्जा केलेला दिसून येत आहे. फळ विकेते, फर्निचर, विविध दुकाने, लहान मोठे स्टॉल, पान टपऱ्या बसवून येथे मिनी मार्केट उभारण्यात आले आहे. वर्षानुवर्षे येथे हे व्यवसाय सुरू असून, कोणाच्या आशीर्वादाने हे व्यवसाय सुरू आहेत. कोण या फेरीवाले, दुकानदारांकडून भाडे वसूल करत आहे. याला सिडको अधिकाऱ्यांचा आशीर्वाद आहे की भूमाफियांचा याबाबत शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत.



उलव्यामध्ये प्रवेश करताच फेरीवाल्यांचा बाजार भरलेला पाहायला मिळतो नारळ पाणी, आंबे चे स्टोल, फर्निचर मार्केट, चिकन मटन स्टॉल, गॅरेज, नर्सरी तसेच विविध कपड्यांची दुकाने फुटपाथ वर मांडल्याने पादचारी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या भूखंडावर ही लहान दुकाने उभारून त्याच ठिकाणी नैसर्गिक विधी देखील उरकले जात असल्याने अस्वच्छता पसरत आहे. मुंबईमधून नवी मुंबई मध्ये राहण्याची नागरिकांनी पसंती दर्शवली आहे. त्यात सध्या विमानतळामुळे उलवे हे पसंतीचे ठिकाण ठरत आहे. उलवे परिसरामध्ये कमी किंमतीमध्ये घरे मिळत असल्याने तसेच मोकळे हवेशीर वातावरण असल्यामुळे नागरिक उलवे शहराला पसंती दर्शवत आहेत. मात्र उलवे परिसरामध्ये फेरीवल्याचे अतिक्रमण पाहण्यास मिळत आहे. परिसर बकाल करणाऱ्या ह्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची अनेक नागरिक मागणी देखील करत आहेत. मात्र या फेरीवाल्यांच्या आडून सुरू असलेले अर्थकारण आड येत असल्याचा आरोप होऊ लागला आहे. या अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना विज, पाणी मिळते कोठून हा देखील प्रश्न निर्माण होत आहे.



संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन फेरीवाल्यांवर कारवाई करून फेरीवाला हटाव मोहीम राबविण्याची आवश्यकता असल्याचे दिसून येत आहे नागरिकांची राहण्याची संख्या कमी मात्र फेरीवाल्यांची संख्या वाढल्यामुळे पूर्वे परिसर हा फेरीवाला परिसर म्हणून ओळखला जाणार की काय अशी चर्चा सध्या चालू आहे.


थोडे नवीन जरा जुने