थोर तत्त्वज्ञ, कुशाल प्रशासक, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती

पनवेल / प्रतिनिधी

 थोर तत्त्वज्ञ, कुशाल प्रशासक, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती पनवेल उपजिल्हा न्यायालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्रिवार नमन करण्यात आले.      त्यावेळी जिल्हा न्यायाधीश वर्ग 2 कृ. गं. पालदेवार, जिल्हा न्यायाधीश वर्ग 3 एस. सी. शिंदे, दिवाणी न्यायाधीश व स्तर अ. रा. गुन्नाल, दिवाणी न्यायाधीश क स्तर निलेश रा. इंदलकर, दिवाणी न्यायाधीश क स्तर डी. एम. वाघमारे, दिवाणी न्यायाधीश क स्तर श्रीमती एस. एस. मुजावर ( खान ) तसेच वकील संघटनेतर्फे ॲड. विशाल मुंडकर त्याचप्रमाणे न्यायालयातील सर्व वरिष्ठ कर्मचारी उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने