श्री विरुपाक्ष महादेव मंदिराचा २० वा वर्धापन दिन विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे साजरा




श्री विरुपाक्ष महादेव मंदिराचा २० वा वर्धापन दिन विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे साजरा

 


पनवेल दि.०८ (संजय कदम) : पनवेल मधील जागृत देवस्थान श्री विरुपाक्ष महादेव मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा तीन दिवस मोठया उत्साहात संपन्न झाला. दरवर्षी प्रमाणे यंदाही सेवा समूहाच्या साथीने विविध प्रकारचे होम हवन व सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे देवस्थानाचा २० वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

.   
यानिमित्त रविवारी मंदिरात सकाळपासून पुण्याहवाचन, प्रासाद वास्तू मंडल, मुख्यदेवता मंडल, ग्रहमंडल देवता पूजन व हवन मंदिरातील सर्व देवतांना प्रोक्षण विधी व अभिषेक पूजा तर संध्याकाळी दिपोत्सव साजरा करण्यात आला. तर आज श्री विरुपाक्ष महादेवाला कुंभाभिषेक करण्यात आला. 


 त्यानंतर प्रत्येक देवाला आंबा फळाचे अर्चन करण्यात आली व सहस्र आंब्यांचे अर्चन श्री. विरूपाक्ष महादेवांना करण्यात आली. तसेच श्री. विरूपाक्ष महादेव, श्री. पार्वती माता आणि मंदिराचे शिखरावरील कळस यांना ८१ कुंभातील द्रव्याने स्नपन विधी संपन्न झाला. त्यांनतर आरती, मराठी भक्तीगीत, भावगीत, नाट्यगीत यांचा बहारदार कार्यक्रम 'सूर निरागस हो" संपन्न झाला. यावेळी आपल्या सुरेल गायनाने गायकांनी उपस्थितांची मने जिंकली.



थोडे नवीन जरा जुने