पनवेल वॉईन शॉपचे शेजारी आढळला मृतदेह






पनवेल वॉईन शॉपचे शेजारी आढळला मृतदेह
पनवेल दि.०८ (संजय कदम) : पनवेल शहरातील तक्का येथील पनवेल वॉईन शॉपचे शेजारी फुटपाथवर एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. पनवेल शहर पोलीस सदर इसमाच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. 


               सदर इसमाचे अंदाजे वय ५५ ते ६० वर्ष असून त्याची उंची अंदाजे ५ फुट ६ इंच, वर्ण सावळा, बांधा सडपातळ, डोक्याचे केस पांढरे वाढलेले, दाढी व मिशि वाढलेली व पांढरी, चेहरा उभट आहे. त्याने अंगात तांबूस रंगाचा काळया टिपके असलेला फुल बाहयाचा मळलेला शर्ट व निळया रंगाची मळकट फुल पॅट घातलेली आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी क्र ०२२-२७४५२३३३ किंवा सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील केदार (मो.९७६६४५४२४५) यांच्याशी संपर्क साधावा.



थोडे नवीन जरा जुने