कामगार दिनानिमित्त के.गो.लिमये वाचनालयात वेगवेगळ्या क्षेत्रातील गुणवंत कामगारांचा सत्कार


कामगार दिनानिमित्त के.गो.लिमये वाचनालयात वेगवेगळ्या क्षेत्रातील गुणवंत कामगारांचा सत्कार
पनवेल दि.०८ (वार्ताहर) : के.गो.लिमये सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय, पनवेल येथे कामगार दिनाचे औचित्य साधून पनवेलमधील वेगवेगळ्या क्षेत्रातील गुणवंत कामगारांचा सत्कार कार्यक्रम संपन्न झाला.


                      या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी येथील शिरीष पाटील, देवराम भिसडे ,पनवेल महानगरपालिकेतील रविन्द्र चोणकर, योगेश्वर पाटील, पोस्ट ऑफिसमधील रघुनाथ तांडेल, वैष्णवी पाटील , पनवेल शहर पोलिस ठाणे नवी मुंबई येथील धर्मेश म्हात्रे, सोनी बनसोडे या कर्मचाऱ्यांचा संस्थेतर्फे शाल, पुस्तक, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा ॲड. सुनिता श्रीकांत जोशी यांनी सगळ्यांचे स्वागत करून कार्यक्रमाचे महत्व विशद केले. संस्थेचे कार्यवाह काशिनाथ लक्ष्मण जाधव यांनी कामगार दिनाबद्दल माहिती सांगितली. या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष श्याम वालावलकर, सहकार्यवाह जयश्री शेटे, कार्यकारिणी सदस्य सुनील खेडेकर , रमेश चव्हाण कोमसापचे अध्यक्ष रोहिदास पोटे, नागनाथ डोलारे, संस्थेच्या ग्रंथपाल निकेता शिंदे, लिपिक संपदा जोशी, सेवक संजय दिवटे व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने