मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्याने प्रभाग १८ मध्ये गतिरोधक टाकण्याच्या कामाला सुरुवात
प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी कार्यक्षम मा.नगरसेवक विक्रांत पाटील हे नेहमीच तत्पर असतात.प्रभागातील नागरिकांना त्रास होऊ नये आणि त्यांच्या समस्या लवकरात लवकर कशा सोडवता येतील याकडे नेहमी लक्ष ठेवून असतात.
असाच एक विषय होता की ज्याचा विक्रांत पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून मार्गी लावला आणि तो म्हणजे प्रभागातील महत्वाच्या रस्त्यांवर गतिरोधक असण्याचा विषय.प्रभागात आता जवळ जवळ सर्व महत्वाच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण झाले आहे आणि काही राहिले आहेत.
नवीन झालेल्या रस्त्यांवर गतिरोधक नसल्याने आणि काही ठिकाणी गतिरोधकांची परिस्थिती चांगली नसल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहन चालक वेगाने वाहने चालवत होते त्यामुळे छोट्या मोठ्या दुर्घटनांचे सत्र सुरूच होते.या विषयावर वेळीच लक्ष घालून व नागरिकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन मा.नगरसेवक विक्रांत पाटील यांनी महापालिकेशी पत्र व्यवहार करून तसेच स्मरण पत्र देऊन सातत्याने पाठपुरावा केला
.याची फलश्रुती प्रभाग १८ मधील महत्वाच्या ठिकाणी गतिरोधक टाकण्याचे कामाला सुरुवात करण्यात आली आहे.कार्यक्षम नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने गतिरोधक टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली याबद्दल नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.
Tags
पनवेल