मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोअर कमिटीचे सदस्य रूपेश पाटील यांची युवासेना महाराष्ट्र राज्य सचिव म्हणून नियुक्ती
पनवेल दि.१३ (संजय कदम): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोअर कमिटीचे सदस्य रूपेश पाटील यांची युवासेना महाराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी रुपेश पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, पूर्वेश सरनाईक व कोअर कमिटीच्या सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत.
गेली कित्त्येक वर्षे युवासेनेत सक्रिय कार्यान्वित असलेले रूपेश पाटील हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय होते. ह्या पूर्वी त्यांनी रायगड जिल्हा चिटणीस म्हणून काम केले होते. त्यानंतर त्यानी जिल्ह्यात युवासेना सह सचिव तथा विस्तारक (संपर्क प्रमुख) म्हणून कार्य केले. युवासेनेचे थीमगाणे त्यानी तयार केले असून सत्तांतर झाल्यानंतर त्यानी ४० वरिष्ठ पदाधिकारी यांच्या समवेत जुलै मधे एकनाथ शिंदे यांची साथ देत त्यांचे कार्य सुरु केले. त्यांच्या कार्याची दाखल घेत आता त्यांची युवासेनेच्या महाराष्ट्राच्या सचिव या महत्त्वाच्या पदी नियुक्ती करण्यात आली आहे
. यावेळी रुपेश पाटील यांनी सांगितले की, ही नियुक्ती रायगड जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे कारण जिल्ह्यातून ह्या आधी कधीही संघटनेच्या पदी इतकी मोठी जबाबदारी कोणाला देण्यात आली नव्हती. त्यामुळे ही नियुक्ती माझ्या सोबत आत्तापर्यंत काम केलेल्या सहकारी पदाधिकारी, युवासैनिक व शिवसैनिक तथा वरिष्ठ पदाधिकारी यांच्या संयुक्त कामाने मिळाली आहे असे मत व्यक्त केले.
Tags
पनवेल