स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मनोज संसारे यांच्या दुःखद निधनाने पक्षाची मोठी हानी- रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे
पनवेल दि.१३ (संजय कदम) : स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आणि आंबेडकरी चळवळीचे नेते भाई मनोज संसारे यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाबद्दल रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी श्रद्धांजली व्यक्त करत आंबेडकरी चळवळीचे फार मोठे नुकसान झाले असल्याची भावना व्यक्त केल्या.
भाई मनोज संसारे हे रिपब्लिकन चळवळीचे अतिशय धडाडीचे व आक्रमक नेते होते. त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये गोरगरीब दिन दलित जनतेला न्याय मिळावा म्हणून सरकार विरुद्ध अनेक आंदोलन उभे केली होती. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी ते नेहमी अग्रक्रमाने भाग घ्यायचे. आंबेडकरी चळवळीमध्ये त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य घालवले होते.
त्यांच्या निधनाबद्दल स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी शोक व्यक्त करत भाई मनोज संसारे यांच्या जाण्याने रिपब्लिकन चळवळीचे फार मोठे नुकसान झाले आहे. असा नेता पुन्हा जनमानसात येणार नाही. त्यांच्या परिवाराच्या दुःखात संपूर्ण रायगड जिल्ह्याचे कार्यकर्ते सहभागी आहेत अशा भावना व्यक्त केल्या.
Tags
पनवेल