मिरचीचे भाव गगनाला भिडले









मिरचीचे भाव गगनाला भिडले
स्वयंपाक बनवण्यासाठी लागणारा मसाला प्रामुख्याने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बनवला जात असून सध्या त्यासाठी महिलांची लगबग सुरु आहे. पावसाला सुरवात होण्याअगोदर महिला घरगुती मसाला बनवताना दिसत आहेत.



 परंतु मिरचीचा वाढता बाजार भाव लक्षात घेता मसाल्यांची फोडणी तिखट झाल्याची प्रतिक्रिया त्यांच्याकडून व्यक्त होत आहे. बाजारात बेडकी, लवंगी (तिखट) शंकेश्वरी, घाटी, काश्मिरी अशा विविध जातीच्या मिरच्या उपलब्ध आहेत. या मिरच्यांचे भाव किमान २०० ते ३०० रुपये प्रति किलोच्या घरात आहेत. तर काही ठिकाणी जास्तही घेतले जात आहेत. याशिवाय मसाल्यासाठी लागणारे अन्य सामानही महागले आहेत. मिरचीचा भाव गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे.





थोडे नवीन जरा जुने