पनवेल दि.०४ (वार्ताहर) : पनवेल तालुक्यातील रोहींजण येथून एका अल्पवयीन मुलीचे अज्ञात इसमाने कायदेशीर रखवालीतून अपनयन केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर अल्पवयीन मुलीचे वय 13 वर्षे असून ती अंगाने मध्यम, रंग गव्हाळ, चेहरा गोल, डोळे काळे केस काळे व वाढलेले, उंची अंदाजे 04 फुट 6 इंच आहे. तसेच अंगात काळ्या रंगाचा टि-शर्ट, निळ्या कलरची पॅन्ट, नाकात बारीक चमकी, पायात शुज घातलेले आहे.
त्याचप्रमाणे तिला बंगाली, हिंदी, इंग्रजी व मराठी भाषा बोलता येते. या मुलीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास तळोजा पोलीस ठाणे किंवा पोलीस उपनिरीक्षक विजय यादव (मो.नं. 9664599191) यांच्याशी संपर्क साधावा.
Tags
पनवेल