पडघे येथून तरुण बेपत्ता

पडघे येथून तरुण बेपत्ता
पनवेल दि.०४ (संजय कदम) : पनवेल तालुक्यातील पडघे गाव येथून एक १९ वर्षीय तरुण कोणास काहीएक न सांगता कोठेतरी निघुन गेल्याने तो हरवल्याची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. 


            सिंटु प्रदिप राम असे या तरुणाचे नाव असून तो अंगाने सडपातळ, उंची ५ फुट ७ इंच, रंग सावळा, केस काळे व बारीक, मुछ बारीक व काळी, नाक सरळ, डाव्या कानात पितलळेची बाळी असे या तरुणाचे वर्णन असून त्याने अंगात आकाशी रंगाचे पांढरे चेक्स असलेले फुलशर्ट, निळ्या कलरची जिन्स पॅन्ट व पायात पॅरागॉन कंपनीची स्लिपर घातलेली आहे.


 या तरुणाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास तळोजा पोलीस ठाणे किंवा सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गोरे (मो.नं. ९५५२५९८९७७) यांच्याशी संपर्क साधावा. 


थोडे नवीन जरा जुने