जलवायू कडून सेंट्रल पार्ककडे जाणाऱ्या चौकला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव देण्याची खारघर तळोजा मंडळ भाजप उपाध्यक्षा बिना जयेश गोगरी यांची महापालिकेकडे मागणी
पनवेल दि.१२ (वार्ताहर) : खारघर सेक्टर-२० मधील जलवायू कडून सेंट्रल पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावरील ग्रीन हेरिटेज समोरील चौकला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी खारघर तळोजा मंडळ भाजप उपाध्यक्षा बिना जयेश गोगरी पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे एका निवेदनद्वारे केली आहे.
सिडकोने खारघर वसाहत पनवेल महापालिकेकडे हस्तांतरीत केली आहे. महापालिकेने चौक, रस्ते आणि उद्यान यांना थोर पुरुषांची नावे दिलेली आहेत. जलवायू समोरील ग्रीन हेरिटेज समोरील चौक ज्येष्ठ नागरिकांचे विरंगुळा ठिकाण आहे. या चौक मध्ये परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात येत असतात. 'चौक'कडून चार मार्ग जातात.
तसेच एका बाजूला सेंट्रल पार्क, दुसरीकडे सेंट्रल पार्क, मेट्रो स्थानक, शाळा तर दुसऱ्या बाजूला खारघर वसाहत आणि चौकच्या बाजूला महापालिकेकडून महापौर निवासस्थानचे बांधकाम सुरु आहे. दरम्यान, २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १४० वी जयंती आहे. शांत आणि निसर्ग परिसराला लागून असलेल्या चौकला पनवेल महापालिका प्रशासनाने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव देवून पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी खारघर तळोजा मंडळ भाजप उपाध्यक्षा बिना जयेश गोगरी यांनी पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
Tags
पनवेल