नगरसेविका रुचिता लोंढे यांच्या वतीने द केरला स्टोरी चित्रपटाचे मोफत शो


नगरसेविका रुचिता लोंढे यांच्या वतीने 'द केरला स्टोरी'चित्रपटाचे मोफत शो
पनवेल दि.०६ (संजय कदम) : पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका कु.रुचिता मुग्धा गुरुनाथ लोंढे यांनीही आपल्या वाढदिवसानिमित्त १५ मे रोजी १८ वर्षावरील महिलांकरीता 'द केरला स्टोरी' ह्या चित्रपटाच्या मोफत शोचे आयोजन केले आहे.देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरळ मधील सत्य घटनेवर आधारित, महिलांच्या सन्मानावर आघात करणारा, वास्तवावर प्रकाश टाकणारा 'द केरला स्टोरी' सिनेमा ५ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या घटनेची माहिती सर्व महिलांना पोहोचावी तसेच महिला सक्षमीकरणासाठी महिलांनी तो पाहावा यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका कु.रुचिता मुग्धा गुरुनाथ लोंढेयांनीही आपल्या वाढदिवसानिमित्त पनवेल शहरातील महिलांसाठी पनवेल शहरातील ओरिअन मॉल येथील पीव्हीआर सिनेमास येथे १५ मे रोजी सकाळी १०.३० वाजता १८ वर्षावरील महिलांकरीता 'द केरला स्टोरी' ह्या चित्रपटाच्या मोफत शोचे आयोजन केले आहे. ह्या शोचे तिकीट मर्यादित असून मोफत तिकिटासाठी 9607052454 ह्या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन रुचिता लोंढे यांनी केले आहे.थोडे नवीन जरा जुने