पनवेल दि.०६ (वार्ताहर) : क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशन मार्फत पनवेल महानगरपालिका अतिक्रमण विभागाकडे अनधिकृतरित्या फुटपाथची जागा व्यापणाऱ्या तसेच अनधिकृत शेड उभारणाऱ्या हॉटेल्स मालकांवर लवकरात लवकर कारवाई करावी ही मागणी करण्यात आली आहे. यासंदभार्त क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशनच्या अध्यक्षा रुपालीताई शिंदे यांनी महापालिकेकडे निवेदन दिले आहे.
पदविक्रेत्यांच्या रस्त्यालगत होणारी कारवाई पनवेल महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून होताना अनेक वेळा होत असते मात्र मोठ - मोठी हॉटेल्स व्यवसायकांवर अश्या प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. हॉटेल्स मालकांनी अनधिकृत शेड उभारून अतिक्रमण करून मनमानी कारभार करत आहेत.
नागरिकांना चालण्यासाठी असलेले फुटपाथवर अतिक्रमण करून अनधिकृत शेडवर महापालिका जाणूनबुजून काना डोळा करत असल्याचे चित्र दिसून येते. यासंदर्भात क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशनच्या अध्यक्षा रुपालीताई शिंदे यांनी पनवेल महानगरपालिका प्रभाग ड अधिकारी दीपक सिलकन यांना निवेदन देऊन अनधिकृतरित्या फुटपाथची जागा व्यापणाऱ्या तसेच अनधिकृत शेड उभारणाऱ्या हॉटेल्स मालकांवर लवकरात लवकर कारवाई करावी ही मागणी केली आहे.
Tags
पनवेल