पनवेल दि.०६ (संजय कदम) : पनवेल तालुक्यातील घोटगाव येथे विनापरवाना बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या इसमावर तळोजा पोलिसांनी कारवाई करत बेकायदेशीर मद्यसाठा जप्त केला आहे.
दीपक राजाराम साळुंखे (वय ५४) हा घोटगाव येथील रोशन किराना स्टोर या दुकानाचे पाठीमागे आडोशाला उघडयावर बेकायदेशीर विनापरवाना देशी-विदेशी दारू ताब्यात बाळगुन विक्री करीत असताना तळोजा पोलिसांना आढळून आला. तळोजा पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध कारवाई करत पाच हजार तीनशे वीस रुपये किंमतीचे देशी-विदेशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या.
Tags
पनवेल