नोटा बंदीचा मधुकर कडू यांनी केला निषेध.नोटा बंदीचा मधुकर कडू यांनी केला निषेध.
उरण दि 23(विठ्ठल ममताबादे )देशात सर्वत्र 2000 रुपयाच्या नोटावर बंदी घालण्यात आली असून 30 सप्टेंबर 2023 च्या आत ज्यांच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत किंवा रक्कम आहे ते बँकेत जमा करण्याचे आवाहन केंद्र शासनाने तसेच रिझर्व बँकेने नागरिकांना केले आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, तज्ञ व्यक्तींनी यावर आपले मत व्यक्त केले आहे. तर अनेक राजकीय नेत्यांनी या नोटा बंदीच्या निर्णयावर कडाडून टीका केली आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा बेलपाडा येथील सामाजिक कार्यकर्ते मधुकर कडू यांनी या नोटा बंदीच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत या नोटा बंदीचा निषेध केला आहे.नागरिकांना, जनतेला विश्वासात घेउन नोटा बंदी करायला पाहिजे. मात्र तसे झाले नाही. या नोटा बंदीचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे भाजप व केंद्र शासनाचा निषेध व्यक्त करतो असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर सुदाम कडू यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.थोडे नवीन जरा जुने