ऑफिस ला जातो असे सांगून गेलेला इसम झाला बेपत्ता


ऑफिस ला जातो असे सांगून गेलेला इसम झाला बेपत्ता
पनवेल दि १६ (वार्ताहर) : आपल्या पत्नीबरोबर पनवेल रेल्वे स्टेशन येथे आल्यावर ऑफिस ला जातो असे सांगून गेलेला इसम अद्याप घरी न परतल्याने तो हरवल्याची तक्रार पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.  


                    प्रसाद चंद्रकांत कुरंगळे (वय २९) रा.मु. कांबे, उंची पाच फूट सहा इंच, अंगाने सडपातळ, रंग गोरा, चेहरा उभट, नाक पसरट, डोळे तांबूस घारे बारीक, केस काळे साधारण वाढलेले, दाढी वाढलेली असून अंगात फिक्कट राखाडी रंगाचा फुल बाह्याचा शर्ट त्यावर हॉराईझन इन्फ्रा प्रा. ली. असे लिहिलेले आहे तसेच काळ्या रंगाची फुल ट्राउजर पॅन्ट घातली आहे या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल रेल्वे पोलीस संपर्क क्रमांक २७४६७१२२ किंवा सहा पोलीस उपनिरीक्षक आर. आर. पाटील मो. न. ८३५६०४४५३८ यांच्याशी संपर्क साधावा. 
फोटो - प्रसाद कुरंगळे


थोडे नवीन जरा जुने