पनवेल दि.११ (संजय कदम) : पनवेल शहरातून भरदुपारी एक महागडी सायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडल्याने सायकलमालकांमध्ये भीतीयुक्त वातावरण पसरले आहे.
शहरातील लाईन आळी येथील श्रीदत्त दिगंबर अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या निलेश जगे यांच्या मुलाची साडेदहा हजार रुपये किमतीची महागडी सायकल ते राहत असलेल्या सोसायटीच्या आवारातून अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे
. सदर चोरीची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. याबाबत निलेश जगे यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गेल्या आठवड्यात सुद्धा अश्या प्रकारे सायकल चोरीची घटना घडली होती. वारंवार होणाऱ्या या चोरीच्या घटनेमुळे सायकलमालकांमध्ये भीतीयुक्त वातावरण पसरले आहे.
Tags
पनवेल