माजी आमदार मनोहरशेठ भोईर हे संस्थापक असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर माध्यमिक विद्यालयाचा 10 वी चा निकाल 95.83 टक्के


माजी आमदार मनोहरशेठ भोईर हे संस्थापक असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर माध्यमिक विद्यालयाचा 10 वी चा निकाल 95.83 टक्के
उरण दि 7(विठ्ठल ममताबादे )माजी आमदार मनोहरशेठ भोईर हे संस्थापक अध्यक्ष असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर माध्यमिक विद्यालय नवीन शेवे, उरण यांचा मार्च 2023 परिक्षेत 10 वी चा निकाल 95.83 टक्के लागला आहे, यामध्ये प्रथम क्रमांक ओम रमेश अर्जुन 84.80% , द्वितीय क्रमांक कल्याणी दिपक कोळी 83% ,तृतीय क्रमांक गौरी अवधराज केवट 76.40% , चतुर्थ क्रमांक सुप्रिया रामदुलार मौर्या 69.80% व पंचम क्रमांक कशिष कमलाकर सुतार 69.20% गुण मिळवून पहिल्या पाच मध्ये आले आहेत.
बुधवार दिनांक 07 मे 2023 रोजी या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार भोईर यांची सदिच्छा भेट घेतली.यावेळी या विद्यार्थ्यांचा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांचे शुभहस्ते सत्कार करण्यात आला, सदर वेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष म्हात्रे उपस्थित होते.तसेच या घवघवीत यशाबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकर माध्यमिक उपाध्यक्ष गणेश म्हात्रे, सचिव जगजीवन भोईर, खजिनदार दिनेश घरत, व्यवस्थापक दयाळशेठ भोईर व सर्व संचालक मंडळ यांनी मुख्याध्यापक संतोष म्हात्रे, शिक्षकांचे व सर्व गुणवंत विध्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.


थोडे नवीन जरा जुने