उरण दि 7(विठ्ठल ममताबादे ) छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी पनवेल यांच्या वतीने कायद्याचे विद्यार्थी यांची शैक्षणिक सहल दिल्ली संसद भवन राष्ट्रपती भवन सुप्रिम कोर्ट येथे नेण्यात आली.यावेळी कायदा विद्यार्थी यांना संसदेत लोकसभा राज्यसभा सेंट्रल हॉल यांचे कामकाज कसे चालते याविषयी विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती देण्यात आली.तेथील अधिकारी वर्ग यांनी उत्तम सहकार्य केले. राष्ट्रपती भवन संग्रहालय येथे विद्यार्थी यांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेली राज्यघटना, त्यासाठी ची कमिटी,आजपर्यंतच्या राष्ट्रपती यांची कारकीर्द, स्वातंत्र्य संग्रामातील चलचित्र,थ्री डी शो दाखविण्यात आला.
यामध्ये महात्मा गांधी यांचे स्वतंत्र काळातील योगदान चलचीत्रातून दाखविण्यात आले.स्वतंत्र काळातील विविध तैल चित्र राष्ट्रपती भवन येथे ठेवण्यात आली आहेत.राष्ट्रपती भवन येथील अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती सांगितली.यावेळी भारताचे सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट येथे भेट देण्यात आली त्याच बरोबर ऐतिहासिक वास्तू, लाल किल्ला,कुतुब मिनार, अक्षरधाम, आगरा येथील ताजमहाल, आगरा फोर्ट विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले
Tags
उरण