उरण मध्ये एसीसी सिमेंट कंपनीचा वार्षिक अतूट बंधन सोहळा 2022 उत्साहात संपन्न.
उरण मध्ये एसीसी सिमेंट कंपनीचा वार्षिक अतूट बंधन सोहळा 2022 उत्साहात संपन्न.
उरण दि 18 (विठ्ठल ममताबादे ) एसीसी सिमेंट कंपनी ही एक यशस्वी व जनतेच्या मनातील कंपनी आहे. बांधकाम क्षेत्रात आज एसीसी सिमेंट मोठ्या प्रमाणात वापरले जाते.ग्राहकांच्या प्रथम पसंतीचे व विश्वसनीय अशी कंपनीची ख्याती आहे .


 एसीसी सिमेंट व कॉन्ट्रॅक्टर यांच्यात उत्तम ताळमेळ रहावा व कॉन्ट्रॅक्टर बंधूचा सन्मान करण्यासाठी उरण तालुक्यात वार्षिक अतूट बंधन सोहळा - 2022 उरण कोटनाका येथील आनंदी हॉटेल मध्ये मोठ्या उत्साहात, उत्तम प्रतिसादासह संपन्न झाला.


यावेळी उत्तम कार्य करणा-यां कॉन्ट्रॅक्टर बंधुचा एसी सी कंपनी तर्फे उपाहार देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी पश्चिम विभागाचे टेक्निकल हेड जिग्नेश गांधी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी अतूट बंधन योजनेची ठळक वैशिष्टये बद्दल माहिती दिली. अदानी समूहाबद्दल माहिती देऊन सिमेंट-काँक्रिटचे काम कसे चालते याबाबत मार्गदर्शन केले.


 तर मुंबई विभाग टेक्निकल हेड रामेश्वर जाधव यांनी आपल्या मनोगतात स्कीमची माहिती सांगून जास्तीत जास्त लोकांना प्रोत्साहीत केले.या सोहळ्याला रायगड जिल्हा टेक्निकल ऑफिसर दिनकर सोनसुरकर, एसीसी सेल्स ऑफिसर माजिद राजा तसेच उरणचे एसीसी डीलर/ रिटेलर विक्रेते बंधु आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. सदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात व उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.


थोडे नवीन जरा जुने