शेतकरी वर्गांस पिक विमा विषयी मार्गदर्शन,खते,शेती लागवड,माती परिक्षण विषयी अममोल सल्ला


शेतकरी वर्गांस पिक विमा विषयी मार्गदर्शन,खते,शेती लागवड,माती परिक्षण विषयी अममोल सल्ला 
 
काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा : १७ जून ,

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने स्मरण कृषी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी खालापूर व मंडळकृषी अधिकारी खालापूर व इफको यांचे मार्फत शेतकरी पिक कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात इफको कंपनीचे मार्केटिंग अधिकारी विजय मुदतक यांनी न्यानो युरिया ,न्यानो डीएपी व सागरिका वसफ या ही खतांची माहिती शेतकऱ्यांना दिली,तसेच कंपनी मार्फत शेतकऱ्यांनी या खतांची खरेदी व विक्री करावी याबाबत मार्गदर्शन केले. खते कशी व किती प्रमाणात व कोणत्या वेळेस वापरावी याचे ही मार्गदर्शन केले. तसेच या मेळाव्यात शेतकऱ्यांनी पीक कर्ज कसे घ्यावे व त्याचे फायदे याबाबत पाटील सर रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक खोपोली यांनी मार्गदर्शन केले.                 स्मरण कृषी फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक संतोष दळवी यांनी उपस्तीत शेतकऱ्यांना कंपनी चे कामकाज व कंपनी मध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तसेच कंपनी मध्ये सभासद झाल्यानंतर त्यांचे होणारे फायदे या बाबत माहिती दिली. प्रज्ञा पाटील - तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी ही एफपीओ पुढे कशी न्यावी त्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाय योजना व त्याचे फायदे तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नद्रव्य प्रक्रिया उद्योग याबाबाबत माहिती व मार्गदर्शन केले.            जगदीश देशमुख - मंडळ कृषी अधिकारी यांनी माती परीक्षणाचे महत्व याबत व बीजप्रक्रिया कशी करावी आणि त्याचे फायदे याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच भात लावणी यंत्र याबाबतही माहिती दिली आणि कृषी विभागाच्या विविध योजना तसेच कंपनी मार्फत औजारे खरेदी करून औजारे बँक सुरू करावी याबाबत मार्गदर्शन केले.तसेच न्यनो युरिया वापरण्या संबंधित शेतकऱ्यांना माहीती दिली आणि वेळोवेळी मार्गदर्शन करू असेही सांगितले .
                   आंधळे सर यांनीही आपले मोलाचे मार्गदर्शन दिले. शेतकऱ्यांना कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांचे तर्फे उपलब्ध असणाऱ्या सर्व स्कीम बद्द्ल वेळोवेळी माहिती देऊ व त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचू असे सांगितले.


                  महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे यांचे तर्फे फार्मर प्रोड्युसर कंपनी चे तालुका समन्वयक सुरज काशिद व स्मरण कृषी फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष संतोष दळवी यांनी सर्व खते मोठ्या प्रमाणात संस्थेमार्फत शेतकऱ्यांना योग्य दारात मिळवून देणार अशी ग्वाही दिली. तसेच कंपनी पुढे कशी न्यावी आणि त्याचे कामकाज कसे असावे याचीही माहिती दिली. कंपनीचे सदस्य राजेंद्र पाटील यांनी शेतकऱ्यांनी शेती मध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करावी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच ( नाबार्ड ) कढून ज्या ज्या सुविधा उपलब्ध असतील त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचवू असे सांगितले.तसेच भात पिक विम्याचे अधिकारी अंकुश सर यांनीही भात पिक विम्याविषयी मोलाचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले.
             या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आंधळे सर कृषी सहाय्यक यांनी केले व आभार प्रदर्शन संतोष दळवी यांनी केले.या प्रसंगी सुधागड वैभव फार्मर प्रोड्युसर कंपनीचे डायरेक्टर सर्व मान्यवर, तसेच जेष्ठ पत्रकार सुधीर देशमुख, हनुमंत मोरे आणि शेवाळे हे देखील उपस्थित होते. तसेच प्रगतशील शेतकरी या पुरस्कारणे पुरस्कृत असे चिंतामण कदम आणि शेतकरी बंधू आणि भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.सदर हा कार्यक्रम आपटी येथे घेण्यात आल्यांने याठीकाणी बहुसंख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते


थोडे नवीन जरा जुने