भारतातील वयोवृद्धांची लोकसंख्या 2050पर्यंत 20 टक्क्यांवर पोहोचणार









भारतातील वयोवृद्धांची लोकसंख्या 2050पर्यंत 20 टक्क्यांवर पोहोचणार
पनवेल दि.१९(वार्ताहर): भारतातील आघाडीच्या रिअल इस्टेट विकास कंपन्यांपैकी एक वाधवा ग्रुप आणि प्रायमस सीनियर लिव्हिंग ह्यांनी संयुक्तपणे मुंबईतील पहिल्या सीनियर लिव्हिंग संमेलनाचे आयोजन केले होते. ‘डिकोड द मिस्टेरी ऑफ हॅपी एजिंग’ या शीर्षकाखाली मुंबईतील एमसीए बांद्रा क्लबमध्ये हे संमेलन घेण्यात आले. ह्या संमेलनात मुंबई, नवी मुंबई व ठाणे भागातील 600हून अधिक अशा विक्रमी संख्येने ज्येष्ठ नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला. हे संमेलन सर्वांसाठी सोयीस्कर ठरणाऱ्या वेळातील दोन सत्रांमध्ये झाले.




भारतात सीनियर लिव्हिंगची वाढती आवश्यकता
ऑरमॅक्स कॉम्पास या ग्राहक ज्ञान फर्मने अलीकडेच केलेल्या एका अभ्यासानुसार, मुंबई महानगर प्रदेशातील एकट्या (तरुण पिढीच्या मदतीशिवाय) राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या 2031 सालापर्यंत 2.4 दशलक्ष होणार आहे. एमएमआरमधील ज्येष्ठ नागरिक विभक्त वातावरणात एकट्याने राहण्यास तयार आहेत, असे या अभ्यासाच्या लक्षणीय निष्कर्षांमधून पुढे आले आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या अंदाजे 125 दशलक्ष असून, त्यात वयोवृद्धांचा वाटा 11.7 टक्के आहे. 10 टक्के एवढ्या राष्ट्रीय सरासरीहून तो अधिक आहे



. एकूण लोकसंख्येतील वृद्धांचे प्रमाण आणखी वाढून 2031 सालापर्यंत 15 टक्क्यांपर्यंत जाईल असा अंदाज आहे. अलीकडील काही वर्षांत, अधिक चांगल्या भवितव्यासाठी परदेशात स्थलांतर करणाऱ्या भारतीय तरुणांची संख्या वाढत आहे. त्यांच्यापैकी बहुतेकांचे वयोवृद्ध आईवडील भारतातच शेजारी व मित्रमंडळींच्या सोबत राहण्यास पसंती देत आहेत. ह्यातील बहुतेक वयोवृद्ध आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत. आयुष्यभर कष्ट केल्यामुळे त्यांची जीवनशैली आता चैनीची आहे. आता त्यांना जोडीदारासोबत स्वतंत्र व निश्चिंत आयुष्य जगण्याची इच्छा आहे. आपल्या समाजातील ज्येष्ठ नागरिकांना हव्या असलेल्या सर्व सुविधा व सोयी सीनियर लिव्हिंग होम पुरवते; आपली मुले किंवा कुटुंबावर ओझे न होता त्यांना आयुष्याचा पुरेपूर आनंद घेण्याची मुभा देते.




ह्या संकल्पनेला महत्त्व का प्राप्त होत आहे?
क्रियाशील सीनियर लिव्हिंग समुदाय व्यक्तींच्या आवडीनिवडींना चालना देण्यासाठी तसेच त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी अनुकूल वातावरण पुरवतात. अशा समुदायांमध्ये व्यक्तींसाठी सुरक्षित वातावरण पुरवले जाते, त्यांच्या सर्व व्यक्तिगत आवश्यकतांची काळजी घेतली जाते. हे समुदाय वैद्यकीय सुविधा, मनोरंजनाचे उपक्रम आणि अन्य संसाधने उपलब्ध करून देतात, जेणेकरून, वृद्धत्वाचा काळ निरोगीपणे व प्रतिष्ठेने घालवणे ज्येष्ठ नागरिकांना शक्य होते.



 सीनियर लिव्हिंग समुदाय, समवयस्कांशी सामाजिक संबंध व गुंतवून ठेवणारे उपक्रम ह्यांच्या माध्यमातून, ज्येष्ठ नागरिकांमधील नैराश्य व एकाकीपणाची भावना कमी करण्यातही, सहाय्य करतात. हे समुदाय ज्येष्ठांना स्वयंपूर्ण राहण्याची मुभाही देतात आणि त्याचबरोबर वाढते वय दिमाखात स्वीकारण्यासाठी आवश्यक ते सहाय्यही पुरवतात. वाधवा समूहाचे चेअरमन श्री. विजय वाधवा यांनी 2050 सालातील अंदाजित स्थित्यंतर स्पष्ट करून सांगितले. 2050 सालापर्यंत देशातील वयोवृद्धांचे लोकसंख्येतील प्रमाण 20 टक्क्यांपर्यंत पोहोचलेले असेल आणि भारतातील 60 टक्के कुटुंबे विभक्त असतील हे गृहीत धरता देशात 320000हून अधिक सीनियर लिव्हिंग आस्थापनांची गरज भासेल. "वयोवृद्धांचे लोकसंख्येतील प्रमाण सातत्याने वाढत असल्यामुळे, भारतातील ज्येष्ठ नागरिकांना निरोगी, व्यग्र व आनंदी ठेवण्यात मदत कऱण्यासाठी सीनियर लिव्हिंग समुदाय अपरिहार्य झाले आहेत,” असे ते म्हणाले.



आयुर्मानातील वाढ
भारतातील वयोवृद्धांची संख्या आयुर्मान वाढल्यामुळे जलद गतीने वाढत आहे. 2011 साली झालेल्या जनगणनेनुसार, 60 आणि त्याहून अधिक वय असलेल्यांची संख्या 103 दशलक्ष होती आणि भारताच्या एकूण लोकसंख्येच्या ती 8.6 टक्के होती. 2021 मध्ये ती लोकसंख्या 139 दशलक्षांपर्यंत वाढून एकूण लोकसंख्येच्या 10 टक्के झाली असावी असा अंदाज आहे. सुधारित वैद्यकीय सुविधा आणि आरोग्यसेवांची वाढती उपलब्धता ह्यांमुळे आगामी काही वर्षे हाच कल अपेक्षित आहे. परिणामी, भारतातील वयोवृद्ध पूर्वीच्या तुलनेत खूपच अधिक काळ जगत आहेत. एकाकीपणा ही जगातील सर्वांत भीषण समस्या आहे आणि ही बाब असंख्य अभ्यासांतून पुढे आली आहे, असे प्रायमस सीनियर लिव्हिंगचे व्यवस्थापकीय संचालक श्री. आदर्श नरहरी ह्यांनी नमूद केले. "क्रियाशील सीनियर लिव्हिंग समुदाय एक सुरक्षित व संरक्षित वातावरण पुरवतात. ह्या समुदायांमध्ये वयोवृद्ध व्यक्तींची त्यांच्या विशिष्ट अवस्थेनुसार व्यक्तिनुरूप काळजी घेतली जाते. हे समुदाय वयोवृद्धांना क्रियाशील, स्वतंत्र व सन्मानाने जगण्यास मदत करतात. त्याचबरोबर निकोप वृद्धत्व आणि सक्रिय जीवनशैलीला उत्तेजन देतात. ह्या वसाहतींमध्ये तज्ज्ञांची पथके असतात. रहिवाशांच्या गरजा समजून घेण्यासाठी हे तज्ज्ञ रहिवाशांसोबत काम करतात आणि वृद्धांना त्यांचे छंद व आवडीनिवडी जोपासण्यात मदत करणाऱ्या सुविधा पुरवतात,” असे त्यांनी स्पष्ट केले.



अनेकविध सुविधा
सीनियर लिव्हिंग समुदाय साधारणपणे रहिवाशांच्या वैविध्यपूर्ण गरजा पूर्ण करणाऱ्या अनेकविध सुविधा देऊ करतात. वैद्यकीय सेवा, मनोरंजनाच्या सुविधा, वाहतूक सेवा, हाउसकीपिंग, संरक्षण व पोषणात्मक सेवांचा ह्यात समावेश होतो. रहिवाशांना द्वारपाल (कॉन्सिर्ज) डेस्क, परिचारिका व अन्य व्यावसायिक 24 तास मदत पुरवतात.



नामुष्कीची भावना दूर
अशा प्रकारच्या सीनियर लिव्हिंग होम्समध्ये राहणे ही आता नामुष्कीची बाब राहिलेली नाही हा सीनियर लिव्हिंग होम्सच्या वाढत्या मागणीमागील महत्त्वाचा घटक आहे. ज्येष्ठ नागरिकांना आराम व स्वयंपूर्णता पुरवण्यावरील भर वाढला असल्यामुळे अधिकाधिक ज्येष्ठ नागरिक अशा ठिकाणी राहण्याचा पर्याय स्वीकारू लागले आहे. सुरक्षित व संरक्षित वातावरण, समर्पित सुविधा व सेवा आणि हिरवागार परिसर ह्यांच्या मिलाफामुळे हे भारतातील ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या आयुष्यातील सुवर्णकाळ व्यथित करण्याच्या दृष्टीने आदर्श स्थान ठरत आहे. अशा जागांना असलेली प्रचंड मागणी व वाढती संभाव्यता बघता, वाधवा समूह व प्रायमस सीनियर लिव्हिंग एकत्रितपणे प्रायमस स्वर्ण हे मुंबईतील पहिे सीनियर लिव्हिंग होम घेऊन येत आहेत. पनवेल येथील वाधवा वाइज सिटीमध्ये हे सीनियर लिव्हिंग होम आहे. निसर्गाच्या कुशीत असलेल्या तरीही मुंबई शहराशी उत्तमरित्या जोडलेल्या, 200 एकरांच्या हिरव्यागार परिसरात पसरलेल्या एकात्मिक विकास प्रकल्पाचा हे सीनियर लिव्हिंग संकुल एक भाग आहे




थोडे नवीन जरा जुने