हुक्का पार्लरच्या विषयावर शिवसेना(उद्धव बाळासाहे ठाकरे)आक्रमक; खांदेश्वर पोलिसांकडे केली कारवाईची मागणी





हुक्का पार्लरच्या विषयावर शिवसेना(उद्धव बाळासाहे ठाकरे)आक्रमक; खांदेश्वर पोलिसांकडे केली कारवाईची मागणी



पनवेल दि.१७(वार्ताहर): हुक्का पार्लरची संस्कृती मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. तसेच तरुणाई व्यसनाच्या विळख्यात सापडत आहे. त्यामुळे नवीन पनवेल मध्ये सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना(उद्धव बाळासाहे ठाकरे) च्यावतीने खांदेश्वर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन करण्यात आली आहे.



नवीन पनवेल रस्ता क्रमांक 1 hdfc सर्कलच्या पाठीमागे इडस्ट्रीय प्लॉट मध्ये अनधिकृत हुक्का पार्लर चालू असून आहे. या ठिकाणी अल्पवयीन मुले सुद्धा रात्री बे रात्री ह्या रस्त्यावर नशेमध्ये असतात. दरम्यान तरुण पिढी वाया जाऊ नये या करीत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक वैशाली गलांडे यांची भेट घेऊन या संदर्भात माहिती देऊन कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.



 पनवेल परिसर हे एक ऐतिहासिक शहर असून या शहराची नशेचे शहर अशी ओळख होऊ नये, वेळीच पालकांनी वेळीच सावध होऊन आपल्या पाल्याकडे लक्ष द्यावे, तरुणपिढी वाया जाऊ नये असे आवाहन शिवसेना पदाधिकाऱ्यानी केले आहे. या वेळी शिवसेना शिवसेना(उद्धव बाळासाहे ठाकरे) तालुका प्रमुख विश्वास पेटकर, शहरप्रमुख पनवेल प्रवीण जाधव, युवासेना विधानसभा अधिकारी पराग मोहिते, उपमहानगर प्रमुख रामदास गोंधळी, कार्यालय प्रमुख संदीप तोरणे, शहर समन्व्यक गणेश परब, शाखप्रमुख तानाजी यादव, विभाग प्रमुख शुभम माळी, उपशहर प्रमुख सन्नी टेमघर, युवसैनिक नितीन पाटील आदी उपस्थित होते.



थोडे नवीन जरा जुने