पनवेल दि.१७(संजय कदम): पनवेल शहर परिसरातून एक अल्पवयीन तरुणाचे अपनयन झाल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.
राजेश धुडीया राठोड(वय १७ ) हा घर नं. १३, आझादनगर, पनवेल रेल्वे स्टेशन पार्किंग जवळ, नर्गिस सेंटरचे बाजुला, येथून रागाने राहते घरातून बाहेर गेला असता.
कोणीतरी अज्ञात इसमाने काहीतरी अमीश दाखवून याचे कायदेशीर रखवालीतून त्याचे संमतीशिवाय पळवून नेला आहे. सदर अल्पवयीन तरुणाचा रंग सावळा, अंगाने सडपातळ, चेहरा. गोल, दाढी बारीक, डोक्याची केस बारीक कट केलेला, उंची अंदाजे १६० सेमी, उजव्या हाताचे मनगटाचे वर साईबाबाचा फोटो गोंधलेला,
अंगात सफेद रंगाचा फुल बाहयांचा शर्ट त्यावर छातीजवळ काळा पटटा असलेला, काळया रंगाची फुल जिन्स पॅन्ट, पायात काळया रंगाची प्लास्टीकची स्लीपर आहे. तरी सदर तरुणाबाबत कोणाला अधिक माहिती असल्याच त्यांनी पनवेल शहर पोलीस स्टेशन ०२२-२७४५२३३३ किंवा पोलीस उपनिरीक्षक गणेश फरताडे ९८९२८४९२६२ यांच्याशी संपर्क साधावा
Tags
पनवेल