स्वच्छंद काव्य संगीत संध्या कार्यक्रम संपन्न


स्वच्छंद काव्य संगीत संध्या' कार्यक्रम संपन्न

"घनकचरा अन ओला कचरा रोज कल वेगळा नियमाने वागता तुम्हाला मान मिळे आगळा, पाठ शुद्ध पर्यावरणाचा आमच्याकडूनी शिका, सांगत आहे तुमची आमची नवी मुंबई महापालिका अशा शब्दात कवी श्री. अरुण म्हात्रे यांनी नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत करीत असलेल्या कामाची महती सांगितली आणि 'स्वच्छंद काव्य संगीत संध्या' एकाहून एक सरस कवितांनी उत्तरोत्तर रंगत गेली..स्वच्छ आणि सुंदर शहर ही नवी मुंबईची ओळख असून केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने नेहमीच राज्यात प्रथम क्रमांक कायम राखला असून देशातील मानांकन सतत उंचावत ठेवले आहे. मागील वर्षी 'स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने देशात तृतीय क्रमांकाचे मानांकन पटकावले होते. यावर्षी 'स्वच्छ सर्वेक्षण २०२३' ला सामोरे जाताना 'निश्चय केला, नंबर पहिला' हे ध्येयवाक्य नजरेसमोर ठेवून नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षणाला सामोरी जात आहे. महानगरपालिकेच्या व नवी मुंबईकर नागरिकांच्या या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी मुंबई दूरदर्शनचे माजी सहाय्यक संचालक व निर्माते श्री. जय भाटकर यांच्या 'वैष्णो व्हिजन' या कलानिर्मिती संस्थेच्या वतीने वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात 'स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत 'स्वच्छंद काव्य संगीत संध्या आयोजित करण्यात आली होती. यामध्ये नामवंत कवी प्रा. अशोक बागवे, अरुण म्हात्रे, डॉ. महेश केळुसकर आणि संगीतकार कौशल इनामदार हे नामांकित साहित्यिक, कलावंत सहभागी झाले होते.याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना आयुक्त राजेश नार्वेकर यांनी नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छतेच्या दृष्टीने करीत असलेल्या प्रयत्नांना महाराष्ट्रातील नामवंत कवी आणि संगीतकार यांनी स्वयंस्फूर्तनि कार्यक्रम करून जो उत्स्फूर्त पाठिंबा दिला ही गोष्ट आमचा उत्साह वाढवणारी असल्याचे सांगितले स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने महानगरपालिकेमार्फत करण्यात येणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण कामांची माहिती देतानाच आयुक्तांनी नवी मुंबईत ठिकठिकाणी रेखाटलेल्या चित्रकविता भितीमुळे तसेच मागील वर्षी राष्ट्रीय पातळीवर नोंद घेतल्या गेलेल्या स्वच्छ कवी संमेलनामुळे नवी मुंबईची ओळख 'कवितांचे शहर' म्हणून होऊ लागली असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.संगीतकार कौशल इनामदार यांच्या अत्यंत गाजलेल्या कविवर्य सुरेश भट लिखित, 'लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी' या मराठी भाषा अभिमान गीताने सुरु झालेल्या मैफिलीत 'कवी बोलतो जेव्हा प्राणातून तेव्हा त्याला नसतं हसायचं, कवी बोलतो जेव्हा प्राणातून तेव्हा आपण कवितेसारखं बसायचं या कवी आणि रसिक यांच्यामधील नाते अधोरेखित करणाऱ्या प्रा. अशोक बागवे यांच्या कवितेने रसिकांना साद घातली आणि 'स्वच्छंद काव्य संगीत संध्या' श्रोत्यांच्या वाहव्वा! क्या बात है!' अशा अभिप्रायांची आणि उत्स्फुर्त टाळ्यांची दाद घेत बहरत गेली. डॉ. महेश केळुसकर यांच्या खास मालवणी बोलीतील 'तोळफुलाच्या शेतात' या कवितेने कोकणची काव्यसफर घडविली तसेच त्यांच्या 'झिनझिनाट' या अत्यंत गाजलेल्या कवितेच्या खास ढंगातील सादरीकरणाने रसिकांना भुरळ घातली. अरुण म्हात्रे यांच्या अत्यंत लोकप्रिय असलेल्या 'ती वेळ निराळी होती,ही वेळ निराळी आहे या कवितेने श्रोत्यांना नॉस्टेल्जिक बनविले, त्याचप्रमाणे त्यांच्या नव्याकोऱ्या पाऊस कवितेने श्रोत्यांना प्रेक्षागृहात बसून पावसात भिजण्याचा अनुभव दिला. प्रा. अशोक बागवे यांनी आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई शहर ज्या पध्दतीने प्रयत्न करीत आहे, ते बघता नवी मुंबईचा देशात पहिल्या क्रमांकाचे स्वच्छ शहर ठरण्याचा निश्चय प्रत्यक्षात येईल असा विश्वास व्यक्त केला, त्यांनी सादर केलेल्या नदीच्या किनारी नदीला म्हणावे या गज़ल स्वरूपातील नदीच्या प्रार्थनेला रसिकांनी प्रचंड दाद दिली. संगीतकार कौशल इनामदार यांनी मंचावर उपस्थित तिन्ही कवींच्या गीतकाव्यरचना अप्रतिम शैलीत सादर केल्या. प्रा. अशोक बागवे लिखित 'वासाचा पयला, पाऊस अयला' या संगमेश्वरी बोलीतील गीतकाव्यासोबत रसिकांनी टाळ्यांचा नाद

थोडे नवीन जरा जुने