पनवेल दि. १८ ( वार्ताहर ) : पनवेल जवळील ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या बांधनावाडी येथील कार्यालयात बालग्राम प्रकल्पातील बालकांना शैक्षणिक साहित्य व मासिक किराणा सामान वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून समाजातील अनाथ, गरीब, वंचीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता बालग्राम प्रकल्प राबविला जातो. सदर कार्यक्रमाला ऍड. राम नाक्ति, सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील घरत, सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत म्हात्रे, रोहित नाक्ती, ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती आली तरी शिक्षण सोडायच नाही असा सल्ला यावेळी ऍड.राम नाक्ती यांनी तर भविष्यात मोठे झाल्यावर बालग्रमच्या बालकांनिही अशीच मदत आपल्या गावातील गरज्यूंना करावी असे आव्हान स्वप्नील घरत यांनी आपल्या मनोगतात केलं. संतोष ठाकूर यांनी बालग्राम प्रकल्प यशस्वी होण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सहकाऱ्यांचे ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्यावतीने आभार मानले व चालू शैक्षणिक वर्षात उज्वल कामगिरी करण्यासाठी बालकांना शुभेच्या दिल्या
. यावेळी विद्यर्थ्यांना स्कुल बॅग, कंपास, छत्री, वह्या, पुस्तक, पेन, पेन्सिल इत्यादी शैक्षणिक व महिन्याभरासाठी लागणारे तांदूळ, कडधान्य, तेल, मीठ, पेस्ट यासारखे किराणा सामान वाटप उपस्थित पाहुण्यांचे हस्ते करण्यात आले. सदर सामानासाठी कोकण कट्टा विलेपार्ले, सौ.मेघा पाटील पेण, डॉ. आर. के. लोखंडे पेण, सौ. सुप्रिया कुलकर्णी विलेपार्ले, ऍड. राम नाक्ती पनवेल,स्वप्नील घरत यांनी सहकार्य केले त्यांचेही संस्थेच्यवतीने आभार व्यक्त करण्यात आले
.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राजेश रसाळ यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बालग्राम मित्र सचिन पाटील, मानसी पाटील, राजू पाटील, स्मिता रसाळ,अर्पिता पाटील, प्रशांत सोमासे, जय डगर यांनी अथक मेहनत घेतली.
Tags
पनवेल