बाळाराम शंकर मोरे, प्रदिर्घ सेवेनंतर निवृत्त, प्राथमिक आरोग्य केंद्र वावर्ले, यांनी दिल्या शुभेच्छा
बाळाराम शंकर मोरे, प्रदिर्घ सेवेनंतर निवृत्त, प्राथमिक आरोग्य केंद्र वावर्ले, यांनी दिल्या शुभेच्छा 


काशिनाथ जाधव : प्रतिनिधी 
पाताळगंगा : १ जून , प्राथमिक आरोग्य केंद्र वावर्ले या ठिकाणी शिपाई म्हणून काम करीत असलेले बाळाराम शंकर मोरे,प्रदिर्घ सेवा नंतर निवृत्त होत असतांना,यावेळी त्यांस निरोप देण्यासाठी या डॉक्टर आणी त्यांचा स्टाफ उपस्थित होते.खालापूर तालुक्यातील असलेले पानशिल या गावातील असलेले मोरे यांनी तालुक्याच्या विविध ठिकाणी ग्रामीण रुग्णालयात आपली सेवा बजावली आहे. 
                      बाळाराम मोरे यांनी पेठ आंबिवली,कडाव,कर्जत,त्यांच बरोबर बोरगांव आश्या विविध ठिकाणी आपली सेवा बजावली,कोरोनांच्या काळात त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय असल्यामुळे या आलेल्या महामारी अनेकांना सहकार्य केले.आपण सातत्याने स्वताची काळजी घ्यावी स्वता सुरक्षित रहा असे सल्ले यावेळी ते प्रत्येकांना देत होते.मोरे निवृत्त होत असल्यांचे समजताच सामाजिक,राजकीय,सांस्कृतिक,शैक्षणिक,आरोग्य आश्या विविध मान्यवरांनी त्यांच्या निवास स्थानी जावून त्यांस शुभेच्छा दिल्या.


           आरोग्य क्षेत्रामध्ये गेली ३५ वर्ष सेवा करीत असतांना आज सेवा निवृत्त होत असतांना,त्यांना पुढील आयुष्य,सुखी,समृद्धी भरभराठी जाण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र वावर्ले येथिल सर्व स्टाफ यांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र वावर्ले -डॉ. किरण अशोक पवार,वैद्यकीय अधिकारी -डॉ. रुपाली पाटील,आरोग्य पर्यवेक्षक - भगवान निरगुडे,आरोग्य पर्यवेक्षक - विनोद गंगावणे,कनिष्ठ सहाय्यक- महेंद्र शिंदे ,औषध निर्माता अधिकारी- हर्षल वाटेगावकर तसेच सरपंच आत्माराम ढोले अदि उपस्थित होते.


             यावेळी सर्व कर्मचारी यांनी सेवा निवृतीचा निरोप देण्यात आले.मोठ्या उत्सहाने ढोल ताशाच्या गजरात आणी फटाक्यांच्या अतिषबाजात त्यांची मिरवणूक काढून घरी आले. यावेळी घरी सत्यनारायण या पुजेचे आयोजन करण्यात आले.त्याच बरोबर रात्री गावदेवी भजनी मंडळ पानशिल यांनी सुंदर असे भजन म्हणून अनेकांना मंत्र मुग्ध केले यावेळी जयदास तांडेल,हरेश तांडेल,अमित तांडेल,अमित वानखळे,सचिन तांडेल,निखिल मोरे,सुधिर कुरुंगळे त्याच बरोबर शेकडो चाहते उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने