पनवेल मध्ये कार्यरत असलेल्या क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशन अध्यक्ष सौ. रुपालीताई शिंदे यांनी दि. ३१ मे २०२३ रोजी मा. पोलीस आयुक्त परिमंडळ २, पनवेल यांना आई सावित्रीमाई फुले यांच्याबाबत खोडसाळ खोटी व मानहानीकारक मजकुर व माहिती इंटरनेट वेबसाईट वर प्रसिद केल्याकारणाने "इंडिक टेल्स' (Indic Tales.com) या वेबसाईट विरोधात तथा बदनामीकारक माहिती लिहणाच्या इसमा विरूध्द कठोर कारवाई करणेबाबतचे निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले कि, आई सावित्रीमाई फुले यांनी भारतीय स्त्री शिक्षण व बहुजन समाजासाठी आपले आयुष्य अर्पण केलेले आहे. समाजात न्याय, शांती व बंधुत्व तथा समानतेची शिक्षा भारतीय समाजास दिलेली आहे.
अशी सत्यपरिस्थिती असताना "इंडिक टेल्स' ' (Indic Tales.com) या वेबसाईट माध्यमाने लेख प्रसिध्द करून आमच्या आईची बदनामीकारक व अपमानकारक भाषेचा वापर करून अत्यंत खालच्या दर्जाची बदनामी केलेली आहे. सदरहुचा प्रकार हा अत्यंत संतापजनक व घाणेरडा असुन सदरहु बदनामीमुळे आमच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत.
सदरहू पोर्टलवर बहुजन समाजातील मातेची अशी अवहेलना व बदनामी बाबतचे लेख लिहणाऱ्या वेबसाईट वर व त्याच्या लेखकावर कायदेशीर कारवाई होणे कायदयाने गरजेचे आहे. तरी क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशन च्या वतीने नम्र विनंती कि साहेबांनी सदरहु घटनेची दखल घेवुन महामानवाची बदनामी करणाऱ्या वेबसाईटवर बंदी आणुन आरोपी विरोधात योग्यती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अश्या आशयाचे निवेदन देण्यात आले.
Tags
पनवेल