लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त जाणीव एक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून रिक्षा चालकांसाठी आसन (बेंच) ची सुविधा






लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त जाणीव एक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून रिक्षा चालकांसाठी आसन (बेंच) ची सुविधा



पनवेल दि.०४ (संजय कदम) :लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रम पनवेल शहर व परिसरात राबविण्यात आले होते. त्याअंतर्गत पनवेल शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या जाणीव एक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून रिक्षा चालकांसाठी आसन (बेंच) ची सुविधा देण्यात आली व त्याचे लोकार्पण आज करण्यात आले.


                      जाणीव एक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, मा.नगरसेवक तथा भाजप उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन राजाराम पाटील यांच्या वतीने व संस्थेच्या माध्यमातून शहरातील तालुका पोलीस स्टेशन दत्त मंदिराजवळ व ठाण नाका रोड येथे रिक्षा व्यवसाय करणाऱ्या बांधवांसाठी आसन व्यवस्था (बेंच) ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.


 या बेंचचे लोकार्पण आज करण्यात आले. यावेळी रिक्षा बांधवांसह प्रभाग क्रमांक १८ मधील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते . या आसन सुविधेबद्दल रिक्षा चालकांनी जाणीव एक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, मा.नगरसेवक तथा भाजप उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन राजाराम पाटील यांचे आभार मानले आहेत. 



थोडे नवीन जरा जुने