विदेशी मद्याची बेकायदा वाहतूक करणाऱ्या दोघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागाने केली अटक; एक कोटीची विदेशी दारू जप्त





विदेशी मद्याची बेकायदा वाहतूक करणाऱ्या दोघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागाने केली अटक; एक कोटीची विदेशी दारू जप्त
पनवेल दि.०४ (वार्ताहर) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पनवेलजवळ कल्हेगाव येथे विदेशी मद्याची बेकायदा वाहतूक करणाऱ्या दोघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागाने अटक केली आहे. त्यांच्याकडून १ कोटी ८९ हजार ३६० रुपयांच्या मद्यासह १ कोटी १८ लाख ९४ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.



            राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी परराज्यातील बनावट मद्याविरुद्ध कारवाई करण्याचे दिले होते. याच पार्श्वभूमीवर सहआयुक्त सुनील चव्हाण, कोकण उपायुक्त प्रसाद सुर्वे आणि अधीक्षक डॉ. सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्पादन शुल्क मुंबई-गोवा राष्ट्रीय तपासणी केली जात होती. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पनवेल तालुक्यातील कल्हेगाव येथे गोवा राज्यात निर्मित आणि विक्रीसाठी परवानगी असलेला तसेच महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेला बनावट विदेशी मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती निरीक्षक दिगंबर शेवाळे यांना मिळाली होती. 



त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागाने सापळा रचून बेकायदा विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या राजशेखर परगी (४१) आणि खजा हुसेन हित्तलमनी (५८, रा. हुबली, कर्नाटक) या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १ कोटी १८ लाख ९४ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.


थोडे नवीन जरा जुने