हॉटेल मालकाचा मोबाईल पळवून नेणाऱ्या स्विगी बॉयला खारघर पोलिसांनी केली अटक

हॉटेल मालकाचा मोबाईल पळवून नेणाऱ्या स्विगी बॉयला खारघर पोलिसांनी केली अटक
पनवेल दि.०४ (वार्ताहर) : खारघरमध्ये एका कॅफेमध्ये स्विगी ऑर्डर पार्सल घेण्यासाठी आलेल्या डिलिव्हरी बॉयने काउंटरवर कोणी नसल्याचा फायदा घेत कॅफे मालकाचा एक लाख दहा हजार रुपये किमतीचा आयफोन चोरल्याची घटना घडली होती. याप्रकरणी खारघर पोलिसांनी या चोरट्या डिलेव्हरी बॉयला गोवंडी येथून अटक केली आहे.             खारघरमध्ये ग्लोबस कॅफेमध्ये स्विगी ऑर्डर पार्सल घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीने काउंटरवर कोणी नसल्याचा फायदा घेत कॅफे मालकाचा एक लाख दहा हजार रुपये किमतीचा आयफोन चोरला होता. कॅफे मालक काउंटरवर आल्यावर मोबाइल नसल्याचे लक्षात येताच सीसीटीव्ही फुटेजमध्ये ऑर्डर घेण्यासाठी आलेली व्यक्ती चोरी करताना दिसून आली. कॅफे मालकाने आरोपीवर खारघर पोलिस ठाण्यात चोरी करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला. आरोपी शरीफूला शामसूला शाह (वय २१) याला अटक करण्यात आली आहे. खारघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजीव शेजवळ यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीला पकडण्यास पथक तयार केले होते. त्यांनी आरोपीचे वारंवार लोकेशन व सीडीआरएसडीआर प्राप्त केले. लोकेशन प्राप्त होताच आरोपीवर दोन दिवस पाळत ठेवून गोवंडी येथे अटक केली.


थोडे नवीन जरा जुने