आर्या हेमंत पाटील हिचे क्रिकेट स्पर्धेत सुयश






आर्या हेमंत पाटील हिचे क्रिकेट स्पर्धेत सुयश 




उरण दि 9 (विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील बोकडविरा गावचे सुपुत्र हेमंत पाटील यांची कन्या आर्या हेमंत पाटील ही नेरूळ येथील रायन इंटरनॅशनल स्कूल मध्ये इयत्ता 9 वी मध्ये शिकत असून आर्या पाटील ने क्रिकेट स्पर्धेत दमदार कामगिरी करत उरण तालुक्याचे, रायगड जिल्ह्याचे नाव उज्वल केले आहे.




 रायगड महिला संघात आर्या पाटील कार्यरत असून नाशिक येथे झालेल्या आंतरजिल्हा क्रिकेट सामन्यात तिने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.नाशिक तसेच पुण्याच्या टिम विरुद्ध खेळताना उल्लेखनिय कामगिरी केली. तिच्या या कार्याची दखल घेत तिची निवड महाराष्ट्र क्रिकेट संघात सराव कॅम्पसाठी झाली आहे. उरण मधून आर्या पाटील हि पहिली मुलगी आहे जिची निवड महाराष्ट्र संघात झाली आहे.आर्या पाटीलचे वडील हेमंत पाटील, आई वर्षा हेमंत पाटील, क्रिकेट प्रशिक्षक - नयन कट्टा सर यांचे आर्या पाटीलला मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.उत्तम कामगिरी केल्याने व महाराष्ट्र संघात निवड झाल्याने तिच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
थोडे नवीन जरा जुने